Sunday, March 25, 2012

'शिव-स्मारक' अस्सल हवे - नक्कल नको!

'शिव-स्मारक' अस्सल हवे - नक्कल नको!

सुहास बहुळकर 

मुंबईतील समुदात भव्य शिवस्मारक उभारताना अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याची नक्कल व तुलना कशाला? जे करायचे ते स्वतंत्रपणे करू या की! 

सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात अरबी समुदातील शिव-स्मारकाची योजना गाजते आहे. आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ उडतो आहे. पण ही मूळ योजना म्हणजे अमेरिकेच्या 'स्टॅच्यू ऑफ लिबटीर्'ची अर्थात स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याची नक्कल आहे, हे कोणीच लक्षात घेत नाही. जगात स्वतंत्र्यरीत्या व विलक्षण भव्य-दिव्य निर्माण करणाऱ्यांचीच दखल घेतली जाते, नक्कल करणाऱ्यांची नव्हे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक मरीन ड्राइव्हजवळ समुदात उभारण्याची घोषणा, सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून केली. हे स्मारक म्हणे न्यूयॉर्कच्या स्वातंत्र्यदेवीपेक्षा अर्थात स्टॅच्यू ऑफ लिबटीर्पेक्षा भव्य असेल. हे ऐकून प्रत्येक मराठी माणसाला, मराठी मुलखात असे काहीतरी भव्य दिव्य होत आहे याचा निश्चितच अभिमान वाटला असेल. कारण मराठी माणसाचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनदर्शन घडविणारे एकही भव्य स्मारक महाराष्ट्रात नाही, ही वस्तुस्थिती आहे. ही उणीव योग्य प्रकारे भरून काढलीच पाहिजे. 

मात्र प्रथमदर्शनी प्रकर्षाने जाणवणारी व खटकणारी गोष्ट म्हणजे, आपले सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्य, जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचा मानबिंदू असणाऱ्या 'स्टॅच्यू ऑफ लिबटीर्' या लोकप्रिय स्मारकाशी स्पर्धा करणारे पर्यटन स्थळ किंवा स्मारक १२४ वषेर् उलटल्यावर निर्माण करू पाहात आहे. प्रत्येक बाबतीत हे स्मारक 'स्टॅच्यू ऑफ लिबटीर्'पेक्षा वरचढ कसे करता येईल, या निकषावर स्मारकाचे सर्व तपशील ठरविण्याचा संबंधित मंडळी स्वत:चे डोके न वापरता खटाटोप करीत आहेत. 'स्टॅच्यू ऑफ लिबटीर्' स्मारक सर्वच दृष्टींनी अद्वितीय आहे. त्याची कल्पना करणाऱ्या शिल्पकाराची कल्पनाशक्ती, अवकाशाचे आकलन आणि असे भव्य शिल्प प्रत्यक्षात आणण्याची क्षमता असणारे तंत्रज्ञ व कारागीर अशा अनेक गोष्टींचा संगम या स्मारकात झालेला आढळतो. परंतु महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले अरबी समुदातील महत्त्वाकांक्षी शिवस्मारक, योजना म्हणून प्रथमदर्शनी कितीही आकर्षक वाटले; तरी १८८६मध्ये उद्घाटन झालेल्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यापेक्षा केवळ ३ फूट उंच पुतळा उभा करून आम्ही एकविसाव्या शतकात काय सिद्ध करू पाहात आहोत, हे देखील संबंधितांनी एकदा तपासून पाहावे. कारण प्रत्यक्षात स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा भव्य वाटणार नाही, याची कलावंत म्हणून खात्री आहे. कारण, चबुतऱ्यावर घोडा, त्यावर बसलेले शिवाजी-महाराज व त्यांच्या उंचावलेल्या हातातील तलवारीसकट हा पुतळा १५९ फुटांचा असेल. 

स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा हा फक्त हात उंचावलेल्या मानवाकृतीचा पुतळा आहे. अरबी समुदातील या शिवस्मारकात आपण महाराजांना घोड्यावर बसवून उंचावलेल्या हातात तलवार देऊन स्वातंत्र्यदेवतेपेक्षा मोठ्या आकाराचा पुतळा केवळ ३ फूट उंची वाढवून कसा करणार आहोत, हे मला कलावंत असूनही उमगत नाही. नमुन्यासाठी आपण केवळ उंचावलेल्या हाताचेच उदाहरण घेऊ. स्वातंत्र्यदेवतेच्या मशालीसकट उंचावलेल्या हाताची उंची ४० फूट आहे, तर नियोजित शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील तलवारीसकट उंचावलेल्या हाताची उंची केवळ २४ फूट ४ इंच एवढीच असेल. शिवाय मशालीपेक्षा तलवार लांब असते. हे छोटे मूलही सांगेल. अशा परिस्थितीत स्वातंत्र्यदेवतेपेक्षा मोठा म्हणजे फक्त ३ फूट उंच पुतळा करण्याचा व त्याला भव्य म्हणून स्वत:लाच फसविण्याचा खटाटोप कशासाठी? शिवाय स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यात आतून वरपर्यंत जाण्याची सोय आहे. तिथूून न्यूयॉर्क शहरही न्याहाळता येते. शिवाजीमहाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्यात घोड्याच्या पायातून असे वर जाता येईल का? का या अरबी समुदातील भव्य स्मारकालाही वर जाण्यासाठी आम्ही शिडी लावणार आहोत? 

अतिशयोक्ती सोडून द्या, पण या संपूर्ण संकल्पनेतील पोकळपणा लक्षात घेऊ या. मुंबईतील भव्य शिवस्मारक उभारताना अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याची नक्कल व तुलना कशाला करायची? जे करायचे ते स्वतंत्रपणे करूया की! 

महाराष्ट्रात प्रतिभावान कलावंतांची कमतरता नाही. शिवाय मरीन ड्राइव्ह समोर ६ एकरांवर स्मारक करण्यासाठी १०-१२ एकराचे कृत्रिम बेट तयार करण्याची योजना म्हणजे कल्पनाशून्यतेचा व दिवाळखोरीचा एक उत्तम नमुनाच म्हणावा लागेल. दुबईसारख्या श्रीमंत देशांनी गेली काही वषेर् दुबईजवळ समुदात कृत्रिम बेटं तयार करून 'श्ा२ठ्ठ ४श्ाह्वह्म द्बह्यद्यड्डठ्ठस्त्र' या योजनेद्वारे ती विकण्याची योजना उत्साहाने राबवली. त्यानुसार दुबई भोवतालच्या समुदात अनेक छोटी छोटी बेटं निर्माण झाली. पण गेल्या काही वर्षांत त्यांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा ताण आला असून हा श्रीमंत देशही अशी योजना अंमलात आणावी का याचा पुनविर्चार करीत आहे. सुदैवाने मुंबईजवळच्याच समुदात अनेक नैसगिर्क बेटं असूनही त्यांचा विचार संबंधितांनी का केला नाही हेच कळत नाही. जंजिऱ्याच्या सिद्दीला आव्हान देण्यासाठी शिवाजी महाराजांनी खांदेरी-उंदेरी बेटांवर जलदुर्ग बांधण्याचा प्रयत्न केला होता. ती बेटेही मुंबईपासून फारशी दूर नाहीत. शिवाय मुंबईजवळच समुदातील अलिबागच्या किल्ल्याचा विस्तीर्ण परिसर आहे. त्याचाही विचार करता येईल. पण अशा नैसगिर्करीत्या उपलब्ध पर्यायांचा विचार न करता ज्यांना मरीन ड्राइव्हसमोर कृत्रिम बेट निर्माण करण्यातच कोट्यवधी रुपये 'पाण्यात' घालायचे आहेत त्यांना कोण काय सांगणार? शिवाय या प्रकरणात शासनाचाच सी. आर. झेड. हा कायदा शासनच मोडणार असल्याचे संबंधितांच्या लक्षातच आले नाही की त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे? 

या प्रकल्पाचे जाहीर केलेले अंदाजपत्रक ३०० कोटी रुपयांचे आहे. पण हे अंदाजपत्रक व प्रकल्प पूर्ण होईल त्यावेळचा प्रत्यक्ष खर्च याबाबत महाराष्ट्र शासन कसा व्यवहार करते हे आपण जाणतोच. वांदे-वरळी सीलिंक या पुलाचा खर्च मारुतीच्या शेपटीप्रमाणे कसा वाढत गेला, हे लक्षात ठेवून आत्ता याबद्दल काहीही न बोलणेच इष्ट ठरेल. दुदैर्वाने कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी अशा प्रकल्पाला विरोध करता येणार नाही अशीच आपली मानसिकता आहे. त्यामुळेच शिवाजी महाराजांचे असे भव्य स्मारक कृत्रिम बेट निर्माण करून उभारण्याचे स्वप्न जी मंडळी पाहात आहेत त्यांना असंही वाटत असेल की, 'कुणाची काय बिशाद, शिवछत्रपतींच्या या भव्य स्मारकाला... महाराष्ट्राच्या अस्मितेला विरोध करतील!' कारण विषयच असा भावनाशील व नाजूक आहे की याबाबत मतप्रदर्शन करणेच कठीण आहे. शिवाय कोणच्याही राजकीय पक्षाला अशा प्रकल्पात रस असतोच. सध्या या विषयावरून चाललेले आरोप-प्रत्यारोप व मूलभूत विचार न करता सर्वच राजकीय पक्षांचे नेते करीत असलेली भाषणे याचीच साक्ष आहेत. सर्वसामान्य माणूस याबाबत उदासीनच आहे. कारण त्याचे जगणे हेच त्याच्यासाठी आव्हान आहे. शिवाय अशा कल्पनेतील फोलपणा व नक्कल त्याच्या लक्षात येणेही कठीणच! 

वास्तविक या विषयावर विचार करणारे अनुभवी कलावंत, तज्ञ व अभ्यासक आपल्याकडे नाहीत, असे नाही. पण त्यांना आपल्या लोकशाहीत व महाराष्ट्र राज्यात किती किंमत आहे, हे आपण अनुभवतोच आहोत. अभ्यासक असोत की कलावंत, इतिहासकार असोत की तज्ञ त्यांना विचारतो कोण. त्यांची किंमत 'शून्य' आहे, योजना ठरवताना असो की निर्णय घेताना! 

No comments: