Saturday, April 7, 2012

वार्ता ग्रंथांची.. : फुले-आंबेडकरांच्या चित्रकथा

वार्ता ग्रंथांची.. : फुले-आंबेडकरांच्या चित्रकथा


शनिवार, ७ एप्रिल २०१२  
altaltआजही अनेकांना चित्रकथा म्हटले की 'अमर चित्रकथा'च आठवत असतील. त्यापेक्षा फार निराळय़ा, हल्लीच्या 'ग्राफिक नॉव्हेल'शी नातं सांगणाऱ्या दोन चित्रकथा भारतातून प्रकाशित झाल्या आणि गेल्या वर्षभरात त्यांना जगभरातून प्रतिसादही चांगला मिळाला.  महात्मा जोतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे जीवन- कार्य, हा या चित्रकथांचा विषय. 'अ गार्डनर इन द वेस्टलँड' (ओसाडीत फुले फुलवणारा बगीचाकार) आणि 'भिमायन' या दोन पुस्तकांचे वेगळेपण असे की, यातील चित्रे लोकपरंपरेतूनच आलेली- पारंपरिक चित्रकार दुर्गाबाई आणि सतीश व्याम यांनी काढलेली आहेत. या दोन्ही चित्रकथा सध्या इंग्रजीत आहेत आणि ही पुस्तके प्रकाशित करणाऱ्या 'नवायन'चा, मराठीत येण्याचा विचार सध्यातरी नाही. मात्र, भारतीय भाषांचा आणि त्यात उपलब्ध असलेल्या ज्ञानाचा आदर करून 'नवायन' ने यापूर्वी अनेक पुस्तके काढली आहेत.  'खरलांजी' या विषयावर आनंद तेलतुंबडे यांचे इंग्रजी पुस्तक 'नवायन' ने  काढले आणि फ्रँकफर्ट बुक फेअरमध्येही नेले. संस्थेच्या वेबसाइटवर विक्रीची सोय नसली तरी येत्या आठवडय़ात, फुले - आंबेडकर यांच्या जयंत्यांच्या निमित्ताने या चित्रकथांबद्दलचे कुतूहल पुन्हा वाढेल, यात शंका नाही.  

No comments: