Monday, March 19, 2012

भारतातील गरिबी घटली!

भारतातील गरिबी घटली!

नियोजन आयोगाचा अहवाल 
पाच वर्षांत ७ ३ टक्क्यांचीघट 
वृत्तसंस्था नवी दिल्ली 
भारतातील गरिबीमध्ये२००५ ०६ ते २००९ १०या पाच वर्षांत तब्बल ७ टक्क्यांची घट झाली असूनतिचे प्रमाण २९ टक्क्यांवर आले आहे केंद्रीययोजना आयोगाने सोमवारीयासंदर्भात प्रसिद्ध केलेल्याअहवालातील माहितीनुसारमहाराष्ट्रासह आठ राज्यांमध्येही घट होण्याचे प्रमाण सुमारे १० टक्के आहे 
प्रा सुरेश तेंडुलकर समितीने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार आहारातील पोषणमूल्यांच्या प्रमाणाबरोबरच आरोग्य व शिक्षणावर दरडोई होणाऱ्या खर्चानुसारगरिबीचे प्रमाण ठरविण्यात येते त्यानुसार सध्या देशातील गरिबांची संख्या ३४४७ कोटी इतकी आहे २००४ ०५ मध्ये ही संख्या ४० ७२ कोटी इतकीहोती ही घट शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांमध्ये अधिक वेगाने झाली आहे .ग्रामीण भागामध्ये गरिबीत ८ टक्क्यांची घट होऊन ती ४१ ८ टक्क्यांवरून३३ ८ टक्क्यांपर्यंत घसरली आहे शहरी भागात मात्र ही घट फक्त ४ टक्क्यांची आहे 
महाराष्ट्र ओदिशा मध्य प्रदेश तामिळ नाडू कर्नाटक अशा आठ राज्यांमध्येगरिबीत दहा टक्क्यांनी घट झाली असली तरी बिहार उत्तर प्रदेशसारख्यामोठ्या राज्यांमध्ये ही घसरण अगदीच किरकोळ आहे 
ईशान्येकडील राज्यांमध्ये मात्र गरिबीत घट होण्याऐवजी वाढच झाल्याचे याआकडेवारीत नोंदविण्यात आले आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागातउच्चशिक्षणाचे प्रमाण अधिक असलेल्या घरांमधून गरिबीचे प्रमाण कमी झालेआहे तर कमी शिक्षित घरांमध्ये ते वाढल्याचे आढळून आले आहे 
अहवालातील ठळक नोंदी 
सर्वाधिक ५३ ५ टक्के गरिबी बिहारमध्ये 
ग्रामीण भागांत शेतमजुरांपैकी ५० टक्के तर इतर मजूरांपैकी ४० टक्केदारिद्र्य रेषेखाली 
शहरी भागात कंत्राटी कामगारांमध्ये गरिबीचे प्रमाण ४७ १ टक्केे हेप्रमाण बिहार आसाम सारख्या राज्यांमध्ये ८६ टक्क्यांहून अधिक आहे .) 
ग्रामीण भागातील शीख समाजात गरिबीचे प्रमाण सर्वात कमी ११ ९ टक्के 
शहरी ख्रिश्चन समाजात गरिबीचे प्रमाण सर्वात कमी १२ ९ टक्के 
उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल गुजरात या राज्यांमध्ये मुस्लिमसमाजातील गरिबीचे प्रमाण सर्वाधिक ३१ ते ५३ टक्के 
शहरी भागात मुस्लिम समाजातील गरिबीचे प्रमाण सर्वाधिक ३३ ९ टक्के )
अनुसूचित जातींमध्ये गरिबीचे प्रमाण ३४ १ टक्के 
बिहार उत्तर प्रदेश मणिपूर ओदिशा या राज्यांमधील अनुसूचित जाती -जमातींपैकी दोन तृतीयांश लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली 

No comments: