Sunday, March 18, 2012

कोण हा जोसेफ कोनी?

कोण हा जोसेफ कोनी? 


अनुराग कांबळे 

स्वत:ला देवाचा प्रेषित म्हणवत गेली २५ वर्षे युगांडातील मुलांवर अनन्वित अत्याचार करणा-या या क्रूरर्कम्याच्या घटका आता भरत आल्या आहेत. सोशल नेटवर्किंग साइट्सवरून त्याचे क्रौर्य जगजाहीर झाले असून त्याला पकडण्यासाठी 'कोनी २०१२' हा प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे. 

....... 

मी आता माझ्या भावाला भेटू शकत नाही, पण मी जेव्हा त्याला भेटेन तेव्हा त्याला सांगेन की मी त्याच्यावर किती प्रेम करतो...' कुमारवयीन जेकब, आपल्या भावाच्या आठवणीने गदगदून आलेला. स्वत:ला चटकन सावरत तो म्हणतो 'तुम्ही आत्ता या क्षणाला मला संपवले तरी मला काहीच वाटणार नाही, अशा अवस्थेत जगण्यापेक्षा मरण पत्करणे कधीही चांगलेच' हे बोलताना जेकबच्या डोळ्यांमधील कमालीची हतबलता आपल्याला अस्वस्थ करते. उत्तर युगांडामध्ये गेली २५ वर्षे सुरू असलेल्या रक्तरंजित आंदोलनाचा जेकब हा एक बळी. या सर्व आंदोलनाचा कर्ताधर्ता म्हणजे जोसेफ कोनी! त्याची कथा सांगणारा लघुपट सध्या यू ट्यूबवर वणव्यासारखा पसरतोय. या क्रूरर्कम्याला आवरण्याचे आवाहन करणारे एक आंदोलन उभे राहिले असून सोशल नेटवकिर्ंगच्या माध्यमातून एक नवा लढा उभा राहात आहे. 

स्वत:ला देवाचा प्रेषित म्हणवणाऱ्या जोसेफ कोनी या बंडखोराने (माथेफिरूने?)१९८७ साली स्थापन केलेल्या 'लॉर्ड्स रेसिस्टन्स आमीर् (एलआरए)' ने गेली कित्येक वर्ष युगांडामध्ये घातलेला हैदोस आता जगाच्या कानाकोपऱ्यात पाहिला जातोय. हजारो तरुण तो फॉरवर्ड करताहेत. हा व्हीडिओ पाहिल्यानंतर जगातील एका भागात कोवळ्या जिवांवर सुरू असलेला अत्याचार इतके वषेर् दुर्लक्षित कसा राहिला याविषयी आत्यंतिक चीड निर्माण होते. अन् हे बदलण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे अशीही प्रबळ भावना निर्माण होते. 

अमेरिकेतील कॅलिफोनिर्यामधील जेसन रसेल २००३ साली युगांडामध्ये गेले तेव्हा स्थानिकांशी संवाद साधल्यानंतर त्यांना या हिंसाचाराविषयी कळले. स्वकीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन सुरू करणाऱ्या कोनीने क्रूरतेची एवढी खालची पातळी गाठली की, आपल्या 'आमीर्'मध्ये लढण्यासाठी त्याने किशोरवयीन मुलांना पळवण्यास सुरूवात केली. गेल्या २५ वर्षांत सुमारे ३० हजार मुलांना पळवून, आपल्या आमीर्मध्ये सामील करण्याचा किंवा त्यांनी विरोध केल्यास त्यांचे अवयव तोडून, त्यांचे चेहरे विदूप करून त्यांना सोडून देण्याचा सपाटा कोनीने लावला आहे. मुलींना वासना पुरवण्यासाठी गुलाम बनवणे, त्यांच्यावर बलात्कार करणे यासारखे प्रकार राजरोसपणे युगांडामध्ये सुरू होते. आधी शेजारच्या सुदानमधून मिळत असलेल्या 'रसदी'वर कोनीची आमीर् पोसली जात होती आता मात्र कुठल्याही मदतीविना कोनी आणि त्याची आमीर् दुबळी पडली आहे. 

२००३ साली युगांडाला भेट दिल्यानंतर जेसन अमेरिकेत परतला. त्यानंतर त्याने प्रयत्न सुरू केला तो जनमानसात या समस्येविषयी जागृती निर्माण करण्याचा. राजकीय नेत्यांना भेटून त्यांना या प्रकरणी लक्ष घालावे, तसेच काही धोरण जाहीर करावे यासाठी मिनतवाऱ्या केल्या. परंतु, 'आपल्या देशाचे आथिर्क हित ज्यात नाही त्या प्रकरणांमध्ये हात घालायचे नाही' या शिरस्त्याप्रमाणे अमेरिकन सरकारने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान 'इनव्हिझिबल चिल्ड्रेन' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून जेसनने कोनीची दुष्टकमेर् तरुणांपर्यंत नेण्यास सुरुवात केली. विविध चर्चासत्रे, व्याख्याने आयोजित करून तरुणांना जागृत केले. त्यानंतर अमेरिकेतील प्रसिद्ध २० व्यक्ती आणि ध्येय-धोरणे ठरवण्यात ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे अशा १२ जणांची यादी तयार करून त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन अधिक व्यापक केले आणि यातूनच जन्म घेतला 'कोनी २०१२' या प्रकल्पाने. कोनीच्या पापाचा घडा भरला असून त्याचा अंत करण्यासाठी किंवा त्याला अटक करण्यासाठी २०१२ या चालू वर्षाची मर्यादा ठरवण्यात आली. त्यादृष्टीनेच या संस्थेने सोशल नेटवकिर्ंग साइट्सचा प्रभावी वापर करत इतके वर्ष युगांडाच्या सीमांमध्ये दबून राहिलेल्या या अत्याचाराला वाचा फोडली. आज 'इनव्हिसिबल चिल्ड्रन'च्या ३० मिनीटांच्या या व्हिडीओने विक्रम नोंदवलाय. एप्रिलमध्ये याविषयी पोस्टर आणि बिलबोर्डच्या माध्यमातून आवाज उठवून अमेरिकन सरकारला युगांडा सरकारच्या मदतीसाठी लष्कर पाठवण्यासाठी भाग पाडण्याचं उद्दिष्ट संस्थेच्या अॅक्शन प्लॅनवर आहे. तरुणांचा आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद पाहता हे फार अवघड दिसत नाही... 

जोसेफ कोनी 

जन्म - १९६१ साली (उत्तर युगांडा) 

सन १९८७ मध्ये त्याने एलआरएची स्थापना केली. 

१९९४ मध्ये प्रथमच त्याने शांतीवार्ता सुरू केली. 

६ ऑक्टोबर २००५ साली इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट (आयसीसी)ने त्याच्या विरूद्ध वॉरंट बजावले. 

आयसीसीच्या गुन्हेगारांच्या यादीत कोनीचा पहिला क्रमांक आहे.  

No comments: