Monday, March 19, 2012

शिळे अन्न खाल्याने ६० जणांना विषबाधा

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12331182.cms

शिळे अन्न खाल्याने ६० जणांना विषबाधा
19 Mar 2012, 1844 hrs IST 
 म.टा. वृत्तसेवा, महाबळेश्वर, 

येथील मांघर गावातील कालच्या लग्नासमारंभानंतर शिल्लक राहिलेले शिळे अन्न खाल्ल्याने ८ शाळकरी विद्यार्थ्यांसह सुमारे ६० जणांना अन्न विषबाधा झाली. रुग्णांना तातडीने हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

मांघर गावातील मंगेश जाधव व मालुसर येथील अनिता पवार यांचा विवाहसोडळा मालुसर येथे रविवारी संध्याकाळी पार पडला. वऱ्हाडी मंडळी लग्न आटोपून पुन्हा मांघर येथे परततताना त्यातील काही मंडळींनी मालुसर येथील लग्नाचे जेवण सोबत आणले होते. सोमवारी सकाळी मांघर येथे वऱ्हाडी मंडळींसाठी केलेल्या जेवणातील शिल्लक जेवण खाल्ले तर काही लोकांनी मालुसर येथून आणलेले जेवण खाल्ले. दुपारी १२ नंतर या सर्व लोकांना पोटदुखी सुरु झाली. मळमळ होवून काहींना उलट्या व जुलाब होवू लागले. अशी लक्षणे दिसणाऱ्यांची संख्या वाढल्याने गावात घबराटीचे वातावरण पसरले. त्यातच,शिष्यवृत्तीची परीक्षा असल्याने गावातील काही विद्याथीर् महाबळेश्वरला आले होते. त्यांनाही हा त्रास सुरू झाला. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने त्यांना तातडीने महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून धोका टळला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

No comments: