Tuesday, January 17, 2012

Fwd: [Mulnivasi Karmachari Sangh] मधुपर्क हा वैदिक संस्कृतीचा अविभाज्य भाग होय....



---------- Forwarded message ----------
From: Rakesh Kelkar <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2012/1/17
Subject: [Mulnivasi Karmachari Sangh] मधुपर्क हा वैदिक संस्कृतीचा अविभाज्य भाग होय....
To: Mulnivasi Karmachari Sangh <276373509074205@groups.facebook.com>


मधुपर्क हा वैदिक संस्कृतीचा अविभाज्य भाग होय....
Rakesh Kelkar 1:55pm Jan 17
मधुपर्क हा वैदिक संस्कृतीचा अविभाज्य भाग होय. मधुपर्क म्हणजे आदरातिथ्य. आपले नातेवाईक, श्रेष्ठी जण, आदरणीय व्यक्ती इ. कोणीही घरी आले तरी आपण आजही आदरातिथ्य करतो. वैदिक आर्य संस्कृतीत आदरातिथ्य विधिपूर्वक करण्याची प्रथा होती. त्याचे विशिष्ट नियम आश्वलायनाचार्याने सांगितले आहेत. प्राचीन काळचा हा मधुपर्क आता मूळ रूपात दिसून येत नाही. तथापि, त्याचे अवशेष वैदिक वाङ्मयात तसेच अलिकडेपर्यंत रूढ असलेल्या चालिरितीत दिसून येते. लग्नकार्य आणि इतर विवाह प्रसंगी मधुपर्क केला जात असे. आजही मंगलाष्टकांत +मधुपर्क पूजन+ अशी एक ओळ भटजी म्हणतो.
मधुपर्क म्हणजे मध आणि दूध यांचे मिश्रण अशी दिशाभूल करणारी माहिती ब्राह्मणवादी देत असतात. वस्तुस्थिती अशी आहे की, मांसाशिवाय मधुपर्क होतच नाही. हे मांसही गायीचेच असले पाहिजे, असा स्पष्ट आदेश आश्वलायनाने दिला आहे. अश्वलायनाच्या गृह्यसूत्रात मधुपर्कावर एक स्वतंत्र प्रकरणच आहे. गृह्यसूत्राच्या पहिल्या अध्यात, २४ व्या खंडात हा सर्व भाग येतो. या खंडातले २, ३ आणि ४ क्रमांकाची सूत्रे सांगतात :
सूत्र : स्नातकायोपस्थिताय ।।२।।
सूत्र : राज्ञेच ।।३।।
सूत्र : आचार्यश्वशुरपितृव्यमातुलानां च ।।४।।
अर्थ : घरी आलेला स्नातक म्हणजेच विद्याध्यन करणारा विद्यार्थी, राजा, आचार्य म्हणजेच गुरू, सासरा, चुलता qकवा मामा यांना मधुपर्क पूजा द्यावी.
गाय मारल्याशिवाय मधुपर्क पूर्ण होत नाही असा आदेश देणारी आश्वलायनाची ही पाहा काही सूत्रे :
सूत्र : आचांतोदकाय गां वेदयंते ।।२३।।
अर्थ : आचमन केलेल्याला गाय निवेदन करावी.
सूत्र : हतो मे पाप्मा पाप्मा मे इत इति जपित्वोमकुरूतेति कारयिष्यन् ।।२४।।
अर्थ : प्रतिग्रहकरत्याच्या मनात गाय मारण्याची इच्छा असेल तर +हतो मे पाप्मा पाप्मा मे हत: + हा मंत्र जपावा. +ओमकुरुत+ म्हणून गाय मारण्याची आज्ञा द्यावी.
सूत्र : नामांसो मधुपर्को भवति भवति ।।२६।।
अर्थ : मांसाखेरीज मधुपर्क होत नाही
या सूत्रातील शेवटचे २६ क्रमांकाचे सूत्र अत्यंत स्पष्ट आणि महत्त्वाचे आहे. मांसाखेरीज मधुपर्क म्हणजेच पाहुणचार नाही, असा स्पष्ट शास्त्रादेश ब्राह्मणांसाठी देण्यात आला आहे. त्या आधीच्या २५ व्या सूत्रात गाय मारण्याची इच्छा नसल्यास उत्सर्ग करण्याची आज्ञा आहे. उत्सर्ग म्हणजे गाय महाजनांच्या खर्चाने चालणारया पांजरपोळात नेऊन सोडणे. एका अर्थाने तिला जीवदान देणे. २५ वे सूत्र म्हणते की, माता रुद्राणां दुहिता वसुनामिति जपित्वोमुत्सृजतेत्युत्स्त्रक्ष्यन् ।। याचा अर्थ असा की, गायीचा उत्सर्ग करण्याची इच्छा असल्यास +माता रुद्राणाम दुहिता+ या मंत्राचा जप करून ओमउत्सृजत असे म्हणून उत्सर्ग करण्यास सांगावे. २५ व्या सूत्रावरून आपला असा समज होतो की, गायीला सोडले म्हणजे वैदिक सभ्यतेत दयाधर्म यास स्थान आहे. पण तसे होत नाही. पुढचाच श्लोक सांगतो की, +नामांसो मधुपर्को भवति भवति+ या सूत्रावरील भाष्यकार सांगतात की, गाय पांजरपोळात सोडल्यानंतर दुसरे जनावर मारून त्याच्या मांसाने मधुपर्क करावा.

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments: