Tuesday, January 17, 2012

Fwd: [Bharat Mukti Morcha] वैदिकांच्या ब्राह्मणी ग्रंथांत जन्मापासून...



---------- Forwarded message ----------
From: Rakesh Kelkar <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2012/1/17
Subject: [Bharat Mukti Morcha] वैदिकांच्या ब्राह्मणी ग्रंथांत जन्मापासून...
To: Bharat Mukti Morcha <bharat.mukti.morcha@groups.facebook.com>


वैदिकांच्या ब्राह्मणी ग्रंथांत जन्मापासून...
Rakesh Kelkar 1:50pm Jan 17
वैदिकांच्या ब्राह्मणी ग्रंथांत जन्मापासून मृत्यूपर्यंत सोळा संस्कार लिहिले आहेत. यांतील बहुतेक संस्कारांचे वेळी गाय किंवा बैल मारण्याची प्रथा वैदिक धर्मात होती. आर्यलोकांना शेतीचे विशेष ज्ञान नव्हते. ते पशुपालक होते. त्यामुळे मांस हेच त्यांचे मुख्य अन्न होते. जे माणसाचे मुख्य अन्न असते, तेच त्याच्या धार्मिक विधित महत्त्वाचा भाग ठरते. हे नैसर्गिक न्यायाला धरूनच आहे. त्यामुळेच वैदिक धर्मात अंत्यसंस्काराचे वेळी गाय मारण्याची प्रथा दिसून येते. सोळावा म्हणजेच शेवटचा संस्कार म्हणजेच अंत्यसंस्कार होय. यात गाय मारून ती प्रेतासोबत जाळली जात असे. प्रेतासोबत जाळल्या जाणारया गायीला वेदसाहित्यात अनुस्तरणी असे म्हणतात. व गाय मारून जाळण्याच्या विधिस अनुस्तरणीकर्म म्हणतात. प्रेतासोबत गाय कापण्यामागे मोठी अंधश्रद्धा दिसून येते. अग्निमध्ये जे हवन केले जाते, ते आपल्या पितरांना मिळते, अशी वैदिकांची मान्यता होती. मृत्यू पावलेल्या माणसाला स्वर्गाच्या प्रवासात खायला मिळावे म्हणून गाय मारून आणि जाळून त्याच्यासोबत दिली जात असे.
अनुस्तरणीकर्माचा विधि ऋग्वेदात, शुक्लयजुर्वेदाच्या ३५ व्या अध्यायात, तैत्तिरीय आरण्यकात असेच इतर अनेक सूत्र ग्रंथांत आहे१. गाय मारून तिच्या मांसाचा पिंड देण्यात यावा. मारलेल्या गायीची वपा म्हणजेच चरबी काढून तिने प्रेताच्या मुखास तसेच सर्व शरीरास आच्छादून टाकावे नंतर प्रेतास अग्नि द्यावा, असे या ग्रंथांतील उल्लेख सांगतात. गाय उपलब्ध होणे शक्य नसेल तर बकरीचा कल्प खुद्द ऋगवेवादातच सांगितला आहे२. कल्प म्हणजे पर्याय. ऋगवेदातील या ऋचेचा आद्य (आद्य म्हणजे सुरुवात.) असा :

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments: